कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जाहीर झाले असून, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या चार पक्षांनी एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे. मात्र, जागावाटपात भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांना उमेदवारी न मिळाल्याने अंतर्गत नाराजी पुढे आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीतून विरोधकांची मोट बांधली असून, नाराज गटांचा कल निर्णायक ठरेल.
गोकुळ निवडणुकीत महायुतीचे जागावाटप; नाराजीचे सूर
Source: Tarun Bharat