मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण आणि पी पूर्व विभागातील २३ रस्त्यांच्या डागडुजीसाठी साडेसहा कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीत आला. मात्र काही रस्त्यांवरील अतिक्रमणे प्रत्यक्षात न हटवल्याचा आक्षेप सदस्यांनी घेतल्याने अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रश्नांची उत्तरे येईपर्यंत प्रस्ताव राखून ठेवला. खर्चाचा अंदाज आणि निविदा दरांवरही सदस्यांनी शंका उपस्थित केली.
अतिक्रमण न हटवताच डागडुजीचा प्रस्ताव राखून
Source: Prahaar