मुंबईत १४ फुटांपेक्षा उंच झोपड्यांवरील कारवाई सातत्याने सुरू असून ती तक्रार व प्रकरणानिहाय केली जात आहे, असे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत स्पष्ट केले. सामुहिक कारवाईचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, असेही प्रशासनाने म्हटले. धोकादायक झोपड्या पावसाळ्यात कोसळून जीवितहानी झाल्याने व काही ठिकाणी व्यावसायिक वापर सुरू असल्याने कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
१४ फुटांवरील झोपड्यांवर तक्रारनिहाय कारवाई, प्रशासन ठाम
Source: Prahaar