पुण्यातील एमपीएससी आंदोलन स्थगित झाल्यानंतर आंदोलनातील प्रमुख चेहरा विवेकानंद पाटील यांनी आपल्या पुढील वाटचालीबाबत सूचक उत्तर दिले. एमपीएससीचा अभ्यास की राजकारण, या प्रश्नावर त्यांनी 'कालाय तस्मै नमः' असे म्हणत येणारा काळ उत्तर देईल, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी त्यांना आमदार व्हावे अशा घोषणा दिल्या, मात्र पाटील यांनी राजकारणात प्रवेशाची अधिकृत घोषणा केलेली नाही.
विवेकानंद पाटलांच्या सूचक उत्तराने राजकीय चर्चांना उधाण
Source: Tarun Bharat