ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी तमाशा, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. 'शापित', 'हेच माझं माहेर', 'एक होता विदूषक', 'झपाटलेला' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे ७३ व्या वर्षी निधन
Source: Asianet Marathi