राज्य उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ऐरोली रेल्वेस्थानकासमोर बेलापूर-ठाणे मार्गावर परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला. कारवाईत ४८ हजार बाटल्या आणि ट्रक असा एकूण १ कोटी ३० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोव्यात निर्मित, महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या 'रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की'च्या बाटल्या आढळल्या. आरोपी जावेदखान नवाबखान पिंजारी याला अटक करण्यात आली असून, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध मद्य वाहतुकीत ट्रक जप्त, एक अटक
Source: Prahaar