शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि अवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तक्रारींची पडताळणी करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत इमारतींच्या नोंदणीवरही निर्बंध लावले जाणार असून नियमित होऊ न शकणाऱ्या इमारती पाडाव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांवर कर्जवसुलीचा तगादा तर कारवाई
Source: Prahaar