योनी भागात खाज आणि वेदना होणाऱ्या महिलांमध्ये लायकेन स्क्लेरोससचं निदान उशिरा होत असल्याचं समोर आलं आहे. ब्रिस्टल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार सुमारे एक टक्के महिलांना हा आजार होतो, मात्र संकोच आणि माहितीच्या अभावामुळे अनेकांचं निदानच होत नाही. हा आजार संसर्गजन्य नसून आयुष्यभर राहू शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.
लायकेन स्क्लेरोससच्या उशिरा निदानामुळे महिलांना वेदना
Source: BBC Marathi