महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागात १ हजार ४४० नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी १२ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नियुक्ती आदेशांचे वितरण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राज्यात १४४० नवनियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
Source: Lokshahi Marathi