अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार २६ ते ६४ वयोगटातील प्रौढांना दररोज ७ ते ९ तास झोप आवश्यक असते. मात्र काहींना केवळ ४ ते ६.५ तासांतही थकवा जाणवत नाही. 'फॅमिलियल नॅचरल शॉर्ट स्लीप' (FNSS) या दुर्मिळ अनुवंशिक स्थितीमागे जनुकीय बदल असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. या बदलांमुळे कमी झोपेचे काही दुष्परिणाम टळू शकतात, असे पुरावे सूचित करतात.
कमी झोपेचे कारण जनुकीय बदलात, संशोधन सुरू
Source: BBC Marathi