पुण्यात २९ वर्षीय पायल पवार-झांबरे हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे. माहेरून पैसे व सोने आणण्याचा तगादा केल्याचा आरोपही त्यांनी केला. पती अक्षय झांबरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पती, सासू, सासरे व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल असून सासू-नणंद ४८ तासांपासून फरार आहेत; सासरे अरविंद झांबरे रुग्णालयात दाखल आहेत.
पुण्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती ताब्यात
Source: Lokshahi Marathi