बोरीवलीतील अतिक्रमण न हटवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांना ५ लाख रुपयांचा दंड आणि नोव्हेंबरचे वेतन रोखण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे स्थायी समितीत सांगण्यात आले. न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करून दिशाभूल केल्याचा आरोप करत अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी संबंधित विधी व आर मध्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत निलंबित करण्याचे निर्देश दिले असून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
आयुक्तांना दंड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी
Source: Prahaar