दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर विशेष मोहीम राबवली आहे. १ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत ९ हजार ६६७ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यात ९५४ परवाने निलंबित, २५ रद्द करण्यात आले तर सुमारे ३९८ टन अन्नसाठा, ६४ कोटी ४५ लाख रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही माहिती दिली.
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी FDAची कारवाई; ९५४ परवाने निलंबित
Source: Lokshahi Marathi