दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे हवेतील कार्बन मोनोक्साइड, सल्फर डायऑक्साइड यांसारख्या घटकांचे प्रमाण वाढते. यामुळे श्वासनलिकेला सूज येऊन दमा, सीओपीडी आणि ॲलर्जीच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो; काहींना अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ येऊ शकते. दिल्लीसारख्या शहरांत बंदी असूनही फटाके फुटत असल्याने तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे.
फटाक्यांचा धूर आरोग्यासाठी धोकादायक; तज्ज्ञांकडून खबरदारीचे आवाहन
Source: Prahaar