दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त व शिळ्या मिठाईपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. दोन-तीन दिवसांपेक्षा जुनी मिठाई किंवा खवा खरेदी करू नये, तसेच लेबल, निर्मितीची तारीख व घटक तपासावेत, असे त्यांनी सांगितले. राज्यव्यापी तपासणी मोहिमेत 9 हजार 667 आस्थापनांची तपासणी होऊन 398 टन अन्नसाठा जप्त करण्यात आला.
दिवाळीत जुनी मिठाई टाळा; अन्न व औषध प्रशासनाचा इशारा
Source: Prahaar