अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयानंतर अकोले येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी मोठा दावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असते तर ही निवडणूकच झाली नसती, असे ते म्हणाले. आर्थिक अडचणीत असलेल्या अगस्ती कारखान्याला मदत व्हावी या उद्देशाने आपण निवडणूक लढवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार असते तर जिल्हा बँक निवडणूकच झाली नसती: गायकर
Source: Sarkarnama