अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवड 12 नोव्हेंबरला होणार असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची चौंडी येथे भेट घेतली. सुजय विखे अध्यक्षपदाच्या चर्चेत असल्याने या भेटीला महत्त्व आले आहे. विखे-थोरात सहमती गटाकडे 18 पैकी 17 जागांचे बहुमत असूनही थोरातांचे वर्चस्व आहे.
अहिल्यानगर जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी विखे-शिंदे जुळवाजुळव
Source: Sarkarnama