मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) प्रशिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू केला आहे. सिंगापूरस्थित 'लेव्हल अप स्पोर्ट्सलिटिक्स' सोबत करार झाला असून बीकेसीच्या शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षकांसोबत हे तंत्रज्ञान काम करेल. प्रत्येक खेळपट्टीवर वेगवेगळ्या कोनांत चार कॅमेरे बसवून फलंदाज व गोलंदाजांचे विश्लेषण होणार आहे. अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी हा सध्या प्रायोगिक प्रकल्प असल्याचे सांगितले.
मुंबई क्रिकेटमध्ये AI क्रांती; MCA च्या प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता
Source: Prahaar