त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव येथे प्रेमसंबंधातील वादातून १८ वर्षीय आर्यत कांबळे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. गुरुवारी रात्री ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्गावरील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. संशयित आदित्य मोंढे याला त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली असून, हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्र्यंबकेश्वरात प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या; संशयित अटकेत
Source: Prahaar