भारतीय अष्टपैलू हार्दिक पांड्याचे स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमन पुन्हा लांबणीवर गेले आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनने जाहीर केलेल्या 15 सदस्यीय संघात त्याला स्थान मिळाले नाही; संघाचे नेतृत्व त्याचा भाऊ कृणाल पांड्या करणार आहे. गेल्या मेपासून दुखापतींशी संघर्ष करणाऱ्या हार्दिकला पूर्ण तंदुरुस्तीशिवाय संघात घेतले जाणार नाही, असे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी स्पष्ट केले आहे.
हार्दिक पांड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून बाहेर
Source: Prahaar