अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडल्यामुळे 'कौन बनेगा करोडपती'चं शूटिंग गेल्या आठवड्यापासून थांबवण्यात आलं आहे. महानायक पूर्णपणे बरे होईपर्यंत सेटवर परतणार नाहीत, असं निर्मात्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे चॅनेलला प्रसारणाचं वेळापत्रक बदलावं लागलं असून आधीचे सेलिब्रिटी एपिसोड्स दाखवले जात आहेत. बच्चन यांनी ब्लॉगवरून हळूहळू कामावर परतण्याचा प्रवास सुरू असल्याचं सांगितलं आहे.
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमुळे 'KBC'चं शूटिंग थांबलं
Source: Prahaar