महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी पदसंख्या १६ हजार ७९७ पर्यंत वाढवली आहे. सुरुवातीच्या २ हजार ६१९ पदांवरून ही वाढ झाली असून, नव्याने समाविष्ट संवर्गासाठी १३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज व विकल्प सादर करता येतील. परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी होणार असून, उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्यात आली आहे.
एमपीएससी गट-क परीक्षेत पदसंख्या १६ हजार ७९७ वर
Source: Pudhari