भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्तीनंतर युरोपियन टी-२० प्रीमियर लीग (ETPL) मधील ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघाशी करार केला आहे. ३० जुलै रोजी निवृत्ती घेतलेल्या रहाणेचा हा पहिला परदेशी लीग अनुभव असेल. ETPL चा पहिला हंगाम २६ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान नेदरलँड्स, आयर्लंड आणि स्कॉटलंडच्या संयुक्त विद्यमाने खेळवला जाणार आहे. संघाचे सहसंस्थापक स्टीव्ह वॉ यांनी रहाणेच्या अनुभवाचे कौतुक केले आहे.
अजिंक्य रहाणेची नवी इनिंग; युरोपियन टी-२० लीगमध्ये सहभाग
Source: Prahaar