महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून शनिवारी राज्याच्या अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह कोकणात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, जालना, परभणी, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात ९ ते १३ ऑगस्टदरम्यान तुरळक सरी कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय; अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
Source: Asianet Marathi