राज्य सरकारने शासकीय आणि निमशासकीय वाहनांसाठी विशेष किंवा VIP क्रमांक घेण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार अर्थ विभागाने 11 ऑगस्ट रोजी परिपत्रक जारी करून असा क्रमांक घेण्यासाठी अतिरिक्त निधी मंजूर करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा आदेश सर्व मंत्रालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे आणि महामंडळांना लागू असेल.
शासकीय वाहनांसाठी VIP नंबरवर बंदी; अर्थ विभागाचा आदेश
Source: ABP Majha