गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाला, त्यात तीन मुलींचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचे निष्पन्न झाले. सरकारने शाळेचा परवाना कायमचा रद्द केला असून, मुख्यमंत्र्यांनी तपासणी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू, आश्रमशाळेचा परवाना रद्द
Source: Lokmat