हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील बऊर आणि कांडली गावांमध्ये सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन मोजणीला विरोध करत ती थांबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टला मराठवाड्यात शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांची सुपीक जमीन महामार्गासाठी जाणार असल्याने आंदोलने सुरू आहेत.
शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शिवसेनेच्या आमदाराचा विरोध
Source: Sarkarnama