सूर्यप्रकाशाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, पण जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढतो. मर्यादित वेळ सूर्यप्रकाश घेतल्यास व्हिटॅमिन डी तयार होण्यास मदत होते, हृदयाचं आरोग्य, झोप आणि मानसिक आरोग्य सुधारतं. तज्ज्ञांच्या मते, दिवसाच्या मधल्या वेळेत काही मिनिटे उन्हात बसणं पुरेसं आहे.
व्हिटॅमिन डीसाठी दररोज किती वेळ उन्हात बसावं?
Source: BBC Marathi