इस्रो आता प्रक्षेपण वाहने आणि नियमित उपग्रहांची निर्मिती करणार नाही; ही जबाबदारी खाजगी कंपन्यांकडे सोपवली जाणार आहे. इन-स्पेसचे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका यांनी ही माहिती दिली. पीएसएलव्ही आणि एलव्हीएम-३ या रॉकेटांचेही खाजगीकरण होणार आहे. इस्रो आता संशोधन आणि प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करेल.
इस्रोचे प्रक्षेपण यान निर्मिती थांबणार, जबाबदारी खाजगी क्षेत्राकडे
Source: Sakal