वांद्रे येथील नेव्हील डिसोझा फुटबॉल मैदानावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन करण्यात आले. मुंबईतील मोकळे भूखंड ढापणाऱ्या सरकारविरोधात हे आंदोलन होते. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिल्डर-कंत्राटदारांना मैदाने देण्याचा आरोप केला. मैदाने वाचवण्यासाठी लढा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईतील मैदाने वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे आंदोलन
Source: Saamana