ॲपलसह अनेक कंपन्या जुना स्मार्टफोन बदलून नवीन फोन देण्याची ट्रेड-इन ऑफर देतात. मात्र, फोनमध्ये बँक खाती, कार्ड डिटेल्स, फोटो आणि ब्राऊझिंग हिस्ट्री यांसारखी वैयक्तिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे फोन देण्यापूर्वी संपूर्ण डेटाचा बॅकअप घ्या, सर्व खाती लॉगआउट करा, फॅक्टरी रीसेट करा, सिम व एसडी कार्ड काढा आणि डेटा कायमचा नष्ट करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअर वापरा.
जुना फोन एक्सचेंज करण्यापूर्वी डेटा सुरक्षिततेची काळजी घ्या
Source: BBC Marathi