भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रिलायन्स कॅपिटलविरोधात गुन्हा नोंदवला आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान दिलेल्या सुमारे ३,९०० कोटींच्या कर्जाचा वापर सांगितलेल्या कारणांसाठी न करता समूहातील इतर कंपन्यांकडे वळवल्याचा आरोप आहे. त्यातून LICचं २,६८४.५७ कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. अनिल अंबानी यांनी सर्व आरोप नाकारले असून कायदेशीर मार्गाने बाजू मांडणार असल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
LIC तक्रारीवरून रिलायन्स कॅपिटलविरोधात CBIचा गुन्हा
Source: Lokshahi Marathi