महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने खासगी ट्रॅव्हलर्सना टक्कर देण्यासाठी ताफ्यात २०० नवीन वातानुकूलित व्होल्वो बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात १७० आसनी आणि ३० स्लीपर बसेसचा समावेश असून, २५० किमीपेक्षा जास्त अंतराच्या मार्गांवर दिवसा व रात्री सेवा देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात २०० व्होल्वो बस दाखल
Source: Prahaar