पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत कांदा, लसूण आणि आल्याचे दर तेजीत आहेत. कांदा ५०-६० रुपये, लसूण १८०-२०० रुपये आणि आले १००-१५० रुपये किलो दराने विकला जात आहे. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलोने विकले जात आहे. पावसाच्या उघडीपमुळे पालेभाज्यांचे दर कमी झाले असून मेथी, कोथिंबीर १५-२० रुपये जुडी आहे.
पिंपरी बाजारात कांदा, लसूण, आले तेजीत; लिंबू २०० रुपये किलो
Source: Pudhari