भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर धार्मिक विधी, रक्तदान शिबिरे, अन्नधान्य वाटप आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. डोंबिवलीतील ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात दर्शनाने सुरुवात करून त्यांनी अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि प्रशिक्षण संस्थांना सहकुटुंब भेटी दिल्या. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेटी, फोन व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस राज्यभर सामाजिक उपक्रमांनी साजरा
Source: Lokshahi Marathi