१९८० च्या मतदार यादीतील नावाच्या आरोपांची चौकशी करण्यास नकार देणाऱ्या दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध राउस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने आक्षेप नोंदवला आहे. बीएनएस कलम १७५(३) चे पालन न केल्याने आदेशात स्पष्ट चूक असल्याचे निरीक्षण नोंदवून प्रकरण नव्याने सुनावणीसाठी दंडाधिकाऱ्यांकडे परत पाठवले आहे. सोनिया गांधी ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिक झाल्या, पण १९८० च्या यादीत नाव कसे आले, असा याचिकेतील प्रश्न आहे. पुढील सुनावणी २९ सप्टेंबरला.
सोनिया गांधींच्या नागरिकत्व प्रकरणात नव्याने सुनावणीचे आदेश
Source: Prahaar