मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात 'सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब' गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाची भररस्त्यात धारदार चाकूने छातीत वार करून हत्या करण्यात आली. १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यातून वाद विकोपाला गेला. आरोपीने साथीदारांना बोलावून हल्ला केला. घटनेमुळे परिसरात तणाव पसरला असून पोलीस तपास करत आहेत.
घाटकोपरमध्ये गणेश मंडळ अध्यक्षाची चाकूने हत्या
Source: Prahaar