नाशिकच्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला

नाशिकच्या औषध व्यावसायिकाचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला

नाशिकमधील ४६ वर्षीय औषध व्यावसायिक मुकेश गोवर्धनदास ओबेराय यांचा मृतदेह ठाणे खाडी परिसरात आढळून आला आहे. गणपतीच्या दर्शनासाठी जातो असे सांगून १७ सप्टेंबर रोजी ते दुकानातून बाहेर पडले होते, त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. सरकारवाडा पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता; मोबाईल लोकेशनवरून तपास ठाण्यापर्यंत पोहोचला. कौटुंबिक आजारपण व मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies