राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग येत असून मुलाखतीसह १० हजार पदे भरण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे. पवित्र पोर्टलच्या रूपांतरण फेरीत आतापर्यंत ४ हजार ३२० उमेदवारांची शिफारस झाली असून जिल्हा परिषदांच्या एकूण ११ हजार ८५८ शिक्षकांना रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुल्यमापन १०० गुणांवर होणार असून नियमबाह्य भरती करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईचा इशारा शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे.
शिक्षक भरती: १० हजार पदांसाठी मुलाखती पुढील आठवड्यापासून
Source: Sarkarnama