मुंबई पोलिसांची वॉकी-टॉकी चोरल्याप्रकरणी अंधेरी रेल्वे स्टेशनवरून मोहम्मद नियाज उर्फ फैजान याला अटक करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी टू टँक परिसरातील व्ही.पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीट पोस्टवरून हे उपकरण चोरीला गेले होते. पोलिसांनी सुमारे ७०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीचा माग काढला आणि चोरलेली वॉकी-टॉकी जप्त केली. सतत वाजत असल्याने वैतागून ही चोरी केल्याचे आरोपीने सांगितले असून पुढील चौकशी सुरू आहे.
वॉकी-टॉकी चोरीप्रकरणी अंधेरीतून आरोपी अटकेत
Source: Prahaar