म्हसवड येथे बेकायदेशीर वाळू वाहतूक रोखणाऱ्या पोलिस हवालदार महावीर कोकरे यांना वाळू चोरांनी डंपरच्या पायरीवरून शेकडो मीटर फरफटत नेऊन चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी हवालदारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी प्रितम लोखंडे व अवि तोरणे यांना ताब्यात घेतले आहे. प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यास २८ तास लागल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे.
म्हसवडेत वाळू चोरांनी हवालदाराला डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न
Source: Sarkarnama