संगमनेर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकरी, नागरिक, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकरी व शेतमजुरांना मदत करावी, तालुक्याला हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळावी, अशी मागणी करण्यात आली. प्रांताधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
संगमनेरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
Source: Deshdoot