सुरतमधील कापड बाजारात 9 सप्टेंबरच्या पहाटे लागलेली आग मानवनिर्मित असल्याचं तपासात स्पष्ट झालं. थकीत 10 हजार रुपयांच्या पगाराच्या वादातून आरोपी विनोद सावळे यानं मालक श्याम संगी यांच्या टेक्सटाईल मार्केटला आग लावली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 14 तासांहून अधिक वेळ लागला असून 24 कोटी रुपयांचा माल जळून खाक झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुरतमध्ये पगाराच्या वादातून कापड बाजाराला आग
Source: BBC Marathi