कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या विरोधानंतर राज्य मंत्रिमंडळाने २३ हजार ४७६ पदांचा सुधारित आकृतिबंध मागे घेण्यास मंगळवारी मंजुरी दिली. संघटनांमध्ये एकमत न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, २००९ चा मंजूर आकृतिबंध तात्पुरता कायम राहील. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वंकष आढावा घेऊन फेरप्रस्ताव सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र कृषी सेवा महासंघाने आंदोलन स्थगित केले आहे.
कृषी विभागाचा २३,४७६ पदांचा आकृतिबंध रद्द
Source: Agrowon