वाशिम जिल्ह्यातील माळेगाव तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायत कार्यालय मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आगीत भस्म झाले. यात महत्त्वाच्या फाईल्स, दस्तऐवज, संगणक, प्रिंटर, पाणी टाकी व फर्निचरचे नुकसान झाले; जीवितहानी झाली नाही. १५ व्या वित्त आयोगाच्या कामांबाबतच्या तक्रारींची चौकशी सुरू असतानाच ही घटना घडल्याने घातपाताची चर्चा सुरू आहे. जऊळका पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
वाशिममधील किन्ही ग्रामपंचायत कार्यालयाला आग
Source: Sarkarnama