ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत अधिक मालमत्ता जमा केल्याच्या संशयावरून कर्नाटक लोकायुक्तांनी मंगळवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. बंगळूर, बिदर, मंड्या, चिक्कबळ्ळापूर, गुलबर्गा आणि कोडगू येथे आठ सरकारी अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालये तसेच नातेवाइकांच्या मालमत्तांची झडती घेण्यात आली. रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, महागड्या वस्तू आणि मालमत्तेची कागदपत्रे सापडली असून एकूण मूल्य तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
कर्नाटकात लोकायुक्तांची मोठी छापेमारी; ८ अधिकारी रडारवर
Source: Sarkarnama