मुंबई महापालिकेने ९९,४३५ पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे दिली असूनही पोलिस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. महापालिका आणि पोलीस प्रशासनात समन्वय नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या १०० ते १५० मीटर अंतराबाहेरील फेरीवाल्यांवरही कारवाई होत आहे. विधी व महसूल समितीच्या बैठकीत भाजपचे तेजिंदर सिंग तिवाना यांनी हरकतीचा मुद्दा मांडला, जो अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी राखून ठेवला.
फेरीवाल्यांवरील कारवाईत महापालिका-पोलिसांत समन्वयाचा अभाव
Source: Prahaar