भाजपने २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी व सहप्रभारींची नवी यादी जाहीर केली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केलेल्या या नियुक्त्यांमध्ये विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश, तर बैजयंत जय पांडा यांना महाराष्ट्राचे प्रभारीपद देण्यात आले आहे. स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा व छत्तीसगडची जबाबदारी सोपवली आहे. २०२७च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल महत्त्वाचे मानले जात आहेत.
भाजपची नवी संघटनात्मक टीम जाहीर; तावडेंकडे यूपी, पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
Source: Lokshahi Marathi