महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर पदवीधर तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघांत २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते सायं ४ वाजता मतदान होईल. अधिसूचना २९ सप्टेंबरला प्रसिद्ध होणार असून, २७ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबरला संपणार असल्याने ही निवडणूक होत आहे.
विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान
Source: Prahaar