महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या नाशिक विभागीय चर्चासत्रात ऑक्टोबर छाटणीपूर्वी बाजारपेठेचा विचार करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला. हवामान बदलासाठी संरक्षित उत्पादन, नवीन वाणांचा स्वीकार आणि देशांतर्गत खप वाढविण्यासाठी द्राक्ष महोत्सवांचे नियोजन यावर मार्गदर्शन झाले. शेतकऱ्यांनी स्वतःचा ब्रँड, ग्राहकाभिमुख पॅकिंग आणि थेट विक्री व्यवस्था उभारण्याचे आवाहन करण्यात आले.
द्राक्ष छाटणी नियोजन: 'आधी बाजारपेठ, नंतर उत्पादन'
Source: Agrowon